मुंबईसह परिसरात पुढील दोन दिवसांत हलक्या पावसाची शक्यता

मुंबई : मुंबई आणि त्याच्या उपनगरात आज वातावरण अंशतः ढगाळ राहील. मात्र, पुढील दोन दिवसांत शहरात हलका पाऊस कोसळू शकतो. मंगळवारी सकाळी मुंबईचे तापमान २८.४ डिग्री सेल्सियस होते तर आर्द्रता ८३ टक्के होती. हवामान विभागाच्या पुर्वानुमानानुसार, २३ मे रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

मुंबई लाइव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शहरात मंगळवारी अंशतः ढगाळ वातावरण असेल. २३ मे रोजी दुपारी अथवा संध्याकाळी हलका पाऊस कोसळेल. किमान तापमान ३४ तर कमाल तापमान २७ डिग्री सेल्सिअसपर्यंत राहिल. सिस्टम ऑफ एअर क्वॉलिटी अँड वेदर फोरकास्टिंग रिसर्चच्या (एसएएफएआर) म्हणण्यानुसार, मुंबईत हवेची गुणवत्ता ६२ च्या नोंदीसह समाधानकारक आहे. हवेची गुणवत्ता ० ते ५० यादरम्यान असेल तर चांगली अथवा ५१ ते १०० या श्रेणीत असेल तर समाधानकारक मानली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here