नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये मंगळवारी जोरदार पाऊस झाला. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली आणि यूपीसह अनेक राज्यांत चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) व्यक्त केलेल्या अंदाजानुसार उत्तर मराठवाड़ा, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि गुजरातमध्ये ९ सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता आहे. नऊ सप्टेंबरला हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर पंजाब आणि जम्मू विभागासह पूर्व राजस्थानमध्ये विविध ठिकाणी जोरदार पाऊस होईल. तर उत्तर-पश्चिम भारताच्या बहुतांश भागात किरकोळ पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने नऊ आणि दहा सप्टेंबर रोजी राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांत सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. जयपूर हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, ओडिसा आणि आसपासच्या क्षेत्रात कमी दबावाचे क्षेत्र अधिक तीव्र होऊन कमी दबावाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मान्सून सक्रिय झाला असून उदयपूर, जोधपूर आणि कोटा विभागातील जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
आयएमडीने सांगितले की, ओडिसाच्या अंतर्गत आणि किनारपट्टीवरील जिल्ह्यात अनेक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. भूवनेश्वर हवामान केंद्राने ११ सप्टेंबर २०२१ रोजी उत्तर आणि लगतच्या मध्य बंगालच्या खाडीवर कमी दबावाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असल्याचे ट्वीट केले आहे. हवामान विभागाने नुआपडा, नबरंगपूर, बारगड, झारसुगुडा, सुंदरगड आणि क्योंझर या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link