महाराष्ट्रात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता : आयएमडी

पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात विविध ठिकाणी विजाच्या कडकडाटाह हलक्या पावसाची शक्यता आहे. गारपीट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यामुळे तापमानात घट होईल. उत्तरेकडून तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीतून येणाऱ्या हलक्या हवेचा परिणाम १० ते १३ जानेवारी यांदरम्यान उत्तर पश्चिम आणि मध्य भारतावर हलक्या पावसाच्या रुपाने होणार आहे.

टीव्ही९हिंदी डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार १० जानेवारी रोजी विदर्भ, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट होईल. हलक्या स्वरुपाचा पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ कृष्णानंद होसालीकर यांनी ही माहिती दिली. राज्यभरात हवामान बदल दिसून आला असून काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. पुढील तीन ते चार दिवस अशीच स्थिती राहील. खासकरुन विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. चंद्रपुर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोलीसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. अवकाळी पावसाचा फटका पिकांना मुख्यत्वे भाजीपाल्याला बसू शकतो. मुंबईतही हवामान गतीने बदलले असून शनिवारी येथे अवकाळी पाऊस झाला. सोमवारी हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here