महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामानाचे अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात शुक्रवारीही पावसाचा जोर कायम राहील अशी शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईसह राज्याच्या विविध भागात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार आणखी ५ ते ६ दिवस पावसापासून सुटका होण्याची शक्यता नाही. दरम्यान, या पावसामुळे तापमानातही घट नोंदवली जात आहे. राज्यात सध्या कमाल तापमान ३५ अंशांच्या आसपास नोंदवले आहे. दुसरीकडे, बहुतांश शहरांमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक ‘चांगल्या ते समाधानकारक’ श्रेणीत नोंदवला आहे.

मुंबईत शुक्रवारी कमाल तापमान ३२ आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळ राहील आणि मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. हवेचा दर्जा निर्देशांक ‘समाधानकारक’ आहे. पुण्यात कमाल ३० आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण राहील आणि मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. हवेची गुणवत्ता ‘समाधानकारक’ आहे. नागपुरात कमाल ३४ अंश तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील आणि एक किंवा दोनदा पाऊस पडू शकतो. हवेची गुणवत्ता ‘समाधानकारक’ आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान ३२ तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस असेल. येथेही ढगाळ वातावरण असेल आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. औरंगाबादमध्ये कमाल ३३ अंश तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि हलक्या पावसाची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here