सोलापूरात 32 पैकी 22 कारखानेच सुरु होण्याची शक्यता

सोलापूर : देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोलापूर जिल्ह्यात 32 पैकी 22 कारखानेच यंदाच्या हंगामात सुरु होण्याची शक्यता आहे. यंदा गाळपासाठी असलेल्या एक लाख 4 हजार हेक्टर उसापैकी 20 ते 30 टक्के उस जनावरांच्या छावण्यांसाठी वापरला गेला आहे.

जुलै उजाडला, तरीही सोलापूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने यंदाच्या हंगामात नवीन उसाची लागणही रखडली आहे. यंदा जिल्ह्यात 2 हजार 356 हेक्टरवरच आडसाळी उसाची लागवड आतापर्यंत झाली आहे. त्यामुळे यंदाचा व पुढील गळीत हंगाम या संकटामुळे धोक्यात आला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here