चांद्रयान ३: इस्रोच्या नव्या मिशनसाठी जय्यत तयारी

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) आगामी चंद्रावरील मिशन चांद्रयान ३ ची जय्यत तयारी करण्यात आली आहे. १४ जुलै रोजी दुपारी २.३५ मिनिटांनी याचे लाँचिंग होणार आहे. चांद्रयान तीन आगामी काही दिवसात चांद्रयान २ चे उत्तराधिकारी म्हणून लाँच केले जाणार आहे. जवळपास चार वर्षापूर्वी २२ जुलै २०१९ रोजी ते चंद्रावर पाठविण्यात आले होते. दुर्दैवाने संशोधकांना या मोहिमेत अपयश आले होते. जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, चांद्रयान २ आणि चांद्रयान ३ या दोन्हींचा उद्देश, कार्य समान आहे. इस्रोने यावेळी गेल्यावेळच्या चुका टाळून चांद्रयान ३ मध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून १४ जुलै रोजी दुपारी २.३५ मिनिटांनी चांद्रयान ३ चे उड्डाण होईल. हे मिशन लाँच व्हेइकल मार्क -III द्वारे लाँच केले जाईल. चांद्रयान ३ च्या लॅडर लाँचिंगनंतर नऊ दिवसांनी २३ अथवा २४ ऑगस्ट रोजी ते चंद्रावर सॉफ्ट लाँच करेल अशी अपेक्षा संशोधकांना आहे.

चांद्रयान ३ हे मिशन एक चंद्र दिवसाचे आहे. पृथ्वीवर हा कालावधी १४ दिवसांचा आहे. चांद्रयान २च्या तुलनेत चांद्रयान ३ मधून दोन लॅडर धोक्याची पडताळणी करणे आणि बचाव कॅमेरे वापरले गेले आहेत. चांद्रयान २ मध्ये फक्त एकच कॅमेरा होता. अंतराळ संस्थेने चांद्रयानाच्या पायांची ताकद सुनिश्चित करण्यासाठी लँडर लेग मेकॅनिझम परफॉर्मन्स चाचणी देखील घेतली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here