जिल्हा प्रशासनाचे छापे; साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणी

मंसूरपूर (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी

खतौली आणि मंसूरपुर येथी साखर कारखान्यांवर जिल्हा प्रशासनाने छापे टाकले. या छाप्यात उसाच्या कॉम्प्युटराजड् वजन काट्यांची तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकारी रवीश शर्मा यांच्या सूचनेनुसार जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विवेदी, एसडीएम इंद्रकांत द्विवेदी यांच्या टिमने ही कारवाई केली आहे.

कारवाईमध्ये कारखान्यांच्या गेट वर असलेल्या संगणकीकृत वजन काट्यांची तसेच तेथील आवश्यक सुविधांची पाहणी करण्यात आली.

यात दोन्ही कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणी आणि क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात आले. मॅन्युअल काट्यांवरही उसाचे वजन करण्यात आले. यात काटे योग्य असल्याचे निष्पन्न झाले.

त्याचवेळी छापा टाकणाऱ्या टिमने कारखान्यांना ऊस उत्पादकांची कोणतिही गैरसोय होणार नाही, अशी सुविधा देण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे छापे सातत्याने करण्यात येतील, असे स्पष्ट केले. कोणी काटा मारून शेतकऱ्यांची फसवणूक करत असेल, तर ते सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Download ChiniMandi News App: http://bit.ly/ChiniMandiApp

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here