छत्तीसगढ : सरकारने शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी बोनस देण्याची मागणी

बालोद : राज्य सरकारने ऊस गाळपासाठी जाहीर केलेला ७३ रुपयांचा बोनस आजपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. ही बोनसची रक्कम तातडीने द्यावी अशी, मागणी बालोद जिल्हा ऊस उत्पादक शेतकरी संघाचे संरक्षक छगन देशमुख यांनी केली. याबाबत सर्व संबंधितांना निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

देशमुख म्हणाले की, जर बोनसची रक्कम लवकर मिळाली नाही तर शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील. शेतकर्‍यांच्या समस्यांची पर्वा कोणालाच नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत ५०० रुपये प्रती क्विंटल दर मिळावा, शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रुपये बोनस द्यावा, अशी मागणी जिल्हा ऊस उत्पादक शेतकरी संघातर्फे करण्यात आली आहे. भाताप्रमाणे उसालाही दरवाढ मिळाली पाहिजे, असे ते म्हणाले.

जिल्हा ऊस उत्पादक संघातर्फे मुख्यमंत्री भूपेश बघेल, कृषीमंत्री ताम्रध्वज साहू, जिल्ह्याचे प्रभारी मंत्री तथा प्रदेश काँग्रेस जाहीरनामा समितीचे अध्यक्ष मोहम्मद अकबर यांना निवेदन देण्यात आले. यावर जिल्हा ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष डॉ. तेजराम साहू, उपाध्यक्ष कृष्ण राम साहू, गौचरण गजभिये, त्रिलोकी साहू, हिरालाल ठाकूर, चाणक्य यादव, डोलेश्वर साहू, सावंत राम साहू, ताम्रध्वज साहू, रुपेश साहू आदींची स्वाक्षरी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here