छत्तीसगढ सरकारच्यावतीने इथेनॉल प्लांटसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी

रायपूर : छत्तीसगढ सरकारने नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरू असलेल्या ‘इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेयर-२०२२’ मध्ये छत्तीसगढ बिझनेस समिट २०२२ मध्ये इथेनॉल उत्पादन प्लांट आणि ड्रोन तसेच यूएव्ही उत्पादन युनिट उभारणीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. याबाबत सीएमओच्यावतीने जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, राज्य सरकार आणि एनकेजे बायोफ्युएल, दुर्गचे राजेश गौतम यांदरम्यान सहकारी क्षेत्रातील १४० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे इथेनॉल प्लांट उभारणीसाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. बिझनेस समिटमध्ये कामगार मंत्री शिव धरैया यांनी सांगितले की, छत्तीसगढ हे अनेक संधींचा समावेश असलेले प्रगतीशील राज्य आहे. आणि राज्य सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून उद्योगांसाठी अनेक प्रकारच्या सवलती तसेच सुविधा दिल्या जात आहेत. त्यांनी उद्योजक आणि गुंतवणूकदारांना छत्तीसगढचा दौरा करण्याचे आवाहन केले. राज्यातील प्रगती आणि विकासात आपले योगदान देवून सुविधांचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले.

राज्याच्या वाणिज्य तथा उद्योग विभागाचे सचिव हिम शिखर गुप्ता यांनी सांगितले की, राज्य सरकारने कृषी आणि वन आधारित उद्योगांना प्राधान्य देण्याबरोबरच गु्ंतवणुकीला चांगले वातावरण तयार करण्यासाठी विशेष पॅकेज आणि सवलतींची तरतुद करण्यात आली आहे. यासोबतच उद्योगांची स्थापना तसेच व्यवस्थापनाच्या नियमांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. ते म्हणाले की, छत्तीसगढ सरकार राज्यात युनिट स्थापन करू इच्छिणाऱ्यांना विविध सवलती, प्रोत्साहन, लाभ देत आहे. छत्तीसगढमध्ये उत्पादन युनिट्स स्थापन करण्यासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध आहेत. गुप्ता यांनी सांगितले की, छत्तीसगढमध्ये पुरेशी वीज, कुशल कामगारांची उपलब्धता, जमीन, कमी विज दर, एसईझेड धोरणासह नवे औद्योगिक धोमण २०१९-२४ लागू केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here