छत्तीसगड : एथेनॉलसाठी भाताच्या अतिरिक्त साठ्याच्या वापराचा सरकारचा प्रयत्न

रायपूर : केंद्र सरकारच्या इथेनॉल उत्पादन धोरणात देशातील सर्व राज्ये सहभागी होत आहेत. काही योजनांमध्ये कच्चा माल म्हणून मक्का, भाताचा वापर करता येतो. छत्तीसगड सरकार इथेनॉलसाठी भाताच्या अतिरिक्त साठ्याचा वापर करण्याचा प्रयत्न करीत आहे. भोरमदेव सहकारी साखर कारखान्यात राज्यातील पहिला असा इथेनॉल प्लांट स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उद्घाटनादिवशी विधानसभेत भाषण देताना राज्यपाल अनुसुइया उइके (Governor Anusuiya Uikey) म्हणाल्या की , राज्यात उपलब्ध साधन संपत्तीचा पुरेपूर वापर केला जात आहे. सर्वांना आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यपाल म्हणाल्या की, राज्य सरकार इथेनॉल उत्पादनासाठी भाताच्या अतिरिक्त साठ्याचा वापर करू इ्च्छिते. सरकारचे हे पाऊल प्रशंसनीय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here