सरकारकडून राजीव गांधी शेतकरी न्याय योजनेचे उद्घाटन, ऊस शेतकर्‍यांसह इतरांनाही होणार लाभ

रायपूर : छत्तीसगड सरकारकडून राजीव गांधी शेतकरी न्याय योजना सुरु करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत नियमानुसार एकूण 5700 करोड रुपयांमध्ये पहिल्या टप्प्यात 1500 करोड रुपये ऑनलाईन शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात येतील. सोनिया गांधी आणि राहुल गांधी वीडियो कॉन्फरसिंग च्या माध्यमातून दिल्लीहून या योजनेच्या उद्घाटन सोहळ्यात सामिल होतील.

यापूर्वी, बुधवारी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी वरीष्ठ अधिकार्‍यांसह निवास कार्यालयात योजनेच्या उद्घाटनाच्या तयारीचे पर्यवेक्षण केले. राजीव गांधी शेतकरी न्याय योजना अंतर्गत 1500 करोड रुपये थेट बेनिफीट माध्यमातून शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होतील.

यावेळी योजनेतील लाभार्थी, मनरेगा आणि लघु लाभार्थी, ऊस आणि मका उत्पादक शेतकर्‍यांना विडियो कॉन्फरसींग च्या माध्यमातून सामावून घेतले जाणार आहे. शेतकर्‍यांना शेतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी, या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार खरीफ 2020 च्या हंगामात अधिकतर 10,000 रुपये प्रति एकर दराप्रमाणे तांदूळ आणि मक्याची शेती करणार्‍या शेतकर्‍यांना आर्थिक सहकार्य करेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here