रायपुर : ज्योत्स्ना ग्रीन प्रॉडक्ट्स (Jyotsna Green Products) ने छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील महुदा गावात १५० KLPD क्षमतेचा धान्यावर आधारित इथेनॉल प्रकल्प उभारण्याची योजना आखण्यात आली आहे.
जवळपास १८.६१ एकर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या या प्लांटमध्ये पाच मेगावॅट क्षमतेचा सह विज उत्पादन प्रकल्पही उभारला जाईल. जुलै २०२२ मध्ये पर्यावरण, वन आणि हवमान बदल मंत्रालयाने (MoEFCC) ने ज्योत्स्ना ग्रीनला पर्यावरण मंजुरी (EC) दिली आहे.
याबाबत प्रोजेक्ट्स टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी प्रकल्पासाठी आर्थिक समायोजन करण्याच्या प्रक्रियेत आहे. यांदरम्यान, कंपनी प्रकल्पासाठी अनिवार्य मंजुरीची प्रतीक्षा करीत आहे. प्रकल्पाचे काम नोव्हेंबर २०२४ पर्यंत सुरू होईल. मात्र कंपनीने कंत्राटदार अद्याप निश्चित केलेला नाही.