छत्तीसगढ़ मध्ये रेशन दुकानातून साखरेची पुन्हा चोरी

चम्पा, छत्तीसगढ़: सेवा सहकारी समिती लोहर्सी मध्ये छत्तीसगड खाद्य एवं पोषण सुरक्षा अंतर्गत रेशनकार्ड धारकांना वाटप करण्यासाठी ठेवलेल्या साखरेची अज्ञात चोरांनी चोरी केली. ही चोरी शटरचे कुलूप तोडून करण्यात आली. रेशन दुकानातून जवळपास 10 क्विंटल साखर चोरीला गेली आहे. शासकीय रेशन दुकान शिवरी नारायण बिलासपूर मुख्य रस्त्यालगत स्थित आहे. चोरांनी हा चोरीचा माल मालवाहू वाहनात भरून नेला.

राज्यात साखर चोरीचे हे पहिलेच प्रकरण नाही, यापूर्वी देखील साखर चोरीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यापूर्वी अंबिकापूर मध्ये साखर चोरीचे प्रकरण समोर आले होते. सरकारमान्य रेशन दुकानाचे कुलूप तोडून रेशनचा माल चोरल्याची नोंद ओडगी ठाण्यात दाखल करण्यात आली होती. अलीकडेच, ट्रकमधून साखरेची चोरी करणार्‍या टोळीला सीआयडीसीओ क्राइम रिकवरी टीमने दोन तासातच ताब्यात घेतले होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here