छत्तीसगढमध्ये अतिरिक्त तांदळापासून होणार इथेनॉल उत्पादन

89

रायपूर : छत्तीसगढ अतिरिक्त तांदूळ, ऊस आणि मक्का या पिकाला जैव इंधनामध्ये रुपांतरीत करण्याच्या मुख्य योजनेला पाठबळ मिळाले आहे. केंद्र सरकारने गुरुवारी इथेनॉलला पर्यायी इंधन रुपात मंजूरी दिली आहे.
त्यामुळे आता तेल कंपन्या थेटपणे ई – १०० ला विकू शकतात. यासाठी मोटर स्पिरीट आणि उच्च क्षमतेच्या डिझेल अधिनियम २००५ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे कृषी आधारित उद्योगांना प्रोत्साहन मिळाले आहे. यातून पर्यावरणाच्या रक्षणासह शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी इथेनॉलची उपलब्धताही वाढणार आहे.
याबाबत प्रसार माध्यमांतील माहितीनुसार, छत्तीसगढ बायोफ्युएल डेव्हलपमेंट अॅथॉरिटी योजनेचे प्रमुख अधिकारी सुमात सरकार यांनी सांगितले की, छत्तीसगढ सरकारने केंद्र सरकारकडून इथेनॉल उत्पादन, किंमत निश्चिती यांसारख्या मुद्यांवर आपले धोरण बदलण्याची मागणी केली होती.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here