गोरखपुरमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते १,२०० कोटींच्या इथेनॉल प्लांटचे भूमिपूजन

गेल्या सहा वर्षांत बदललेली राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती देशातील विकासाचे उत्तम उदाहरण बनली आहे. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदार उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी केले. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमध्ये ३६ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत, यावरही त्यांनी भर दिला.

मुख्यमंत्री योगी यांनी गोरखपूरमध्ये १,२०० कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या M/s Keyaan Distilleries Private Limited च्या इथेनॉल आणि ईएनए प्लांटच्या भूमीपूजन समारंभात सहभाग घेतला. त्याची कोनशीला बसवल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, उत्तर प्रदेशमधील कमजोर कायदा आणि सुव्यवस्थेमुळे सहा वर्षांपूर्वी लोक उद्योग सुरू करण्यास घाबरत होते. तत्कालीन सपा – बसपा सरकारच्या काळात, उत्तर प्रदेशातील लोकांना आपली ओळख टिकवण्याच्या संकटाचा सामना करावा लागला होता.

नवा इथेनॉल प्लांट सुरू झाल्याने सहजनवा परिसर हरित ऊर्जेचा केंद्र म्हणून विकसित होईल, असेही मुख्यमंत्री योगी म्हणाले. धान्यावर आधारित इथेनॉल प्लांटच्या स्थापनेमुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नातच लक्षणीय वाढ होईल. याशिवाय तर ऊर्जा आणि पेट्रोलियम क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढले.

याशिवाय, जे पैसे पेट्रोलियम उत्पादनांसाठी परदेशात पाठवले जात होते, ते आता शेतकऱ्यांकडे राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here