छत्तीगढमध्ये २ जी इथेनॉल रिफायनरीस मंजुरी देण्याची मुख्यमंत्र्यांची अमित शहांकडे मागणी

रायपूर : छत्तीसगढमध्ये २ जी इथेनॉल रिफायनरी उभारणीबाबत आवश्यक ते निर्देश द्यावेत अशी मागणी मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे एक पत्र लिहून केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री बघेल यांनी आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये इंधन वितरण कंपन्यांच्या माध्यमातून वाणिज्य योजनेस मंजुरी देण्याची मागणी केली. भात पिकाच्या अवशेषांपासून राज्यात इथेनॉल उत्पादन व्हावे अशी अपेक्षा बघेल यांनी व्यक्त केली.

नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तामध्ये म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या तेल कंपन्यांच्या वतीने रिफायनरीची उभारणी होवू शकते. पत्रामध्ये लिग्नो सेल्युलॉजिक बायोमासवर आधारित बायो इथेनॉल उत्पादनाबाबत विचारणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या इंधन वितरण कंपन्यांकडून रिफायनरी स्थापण्याबाबची मागणी नोंदविण्यात आली. पंतप्रधान जी १ योजनेअंतर्गत पिकांच्या अवशेषांचा वापर यासाठी होवू शकतो. छत्तीसगढमध्ये वार्षिक १३७ लाख टन भाताचे उत्पादन केले जाते. यातील अवशेषांचा वापर करण्यासाठी २ जी लिग्नो सेल्युलॉजिक बायोमासवर आधारित रिफायनरीची गरज आहे. बघेल यांनी याविषयी विचार करण्याची विनंती केंद्रीय गृहमंत्री शहा यांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here