चीननेही भारताविरुद्ध अमेरिकेने लावलेल्या अवाजवी टेरिफला केला विरोध

बीजिंग : चीनने भारताविरुद्ध अमेरिकेने लावलेल्या अवाजवी टेरिफला केला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना या कृतीला ‘टेरिफचा गैरवापर’ म्हटले आहे. रशियाच्या तेलाच्या खरेदीवर भारतावर अतिरिक्त २५ टक्के टेरिफ लावण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाबाबत विचारले असता ते म्हणाले, टेरिफच्या गैरवापराला चीनचा विरोध सातत्यपूर्ण आणि स्पष्ट आहे. तंत्रज्ञान आणि व्यापाराच्या मुद्द्यांचे राजकारण करून त्यांचा गैरवापर करण्याचा अमेरिकेच्या प्रयत्नांना चीनचा विरोध आहे. अमेरिकेने चिनी नागरिकांच्या कायदेशीर हक्कांचे आणि हितांचे प्रामाणिकपणे रक्षण केले पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.

ट्रम्प यांच्या या निर्णयावर अमेरिकेतूनही नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. हाऊस फॉरेन अफेयर्स कमिटी डेम्सने इशारा दिला की, ट्रम्प यांच्या कृतींमुळे काळजीपूर्वक विकसित झालेल्या अमेरिका-भारत संबंध धोक्यात आले आहेत. X वरील एका पोस्टमध्ये, हाऊस फॉरेन अफेयर्स कमिटी डेम्स म्हणाले, ट्रम्प यांच्या ताज्या टॅरिफ वादामुळे अमेरिका-भारत भागीदारी मजबूत करण्यासाठी वर्षानुवर्षे काळजीपूर्वक केलेल्या कामाला धोका निर्माण झाला आहे. आदल्या दिवशी ट्रम्प म्हणाले की, जोपर्यंत टॅरिफवरील वाद मिटत नाही तोपर्यंत भारताशी व्यापार वाटाघाटी होणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here