कोरोना वायरसला थांबवण्यासाठी चीन नष्ट करत आहे हजारो करोड किमतीच्या नोटा

चीन : चीनमध्ये पसरलेल्या कोरोना वायरस च्या घातक रोगाला मिटवण्यासाठी आपल्या मुद्रेला कीटाणू रहित करण्यासाठी त्यांना नष्ट करत आहे. चीनच्या केंद्रीय बँकेच्या गुआंगजौ शाखेने आदेश दिला आहे की, या वायसरच्या संपर्कात येणार्‍या कागदी करंसीला नष्ट करण्यात यावे.

गुआंगजौ हुबेई प्रांताच्या दक्षिण भागात आहे, जिथे कोरोना वायरसचा प्रकोप सर्वात जास्त आहे. बँक शाखा रुग्णालयात, शेतकरी बाजारात आणि बसेस मधूनही सर्व बँकांच्या नोटांना नष्ट केले जात आहे.

वाणिज्यिक बँकांना आदेश दिले गेले आहेत की, काही क्षेत्रात बँकेतील नोटा कीटाणुरहित करणे आणि त्यांना पीपल्स बँक ऑफ चाइना यांना सुपुर्द करण्याचे आदेश दिले जात आहेत. केंद्रीय बँक मुद्रेला किटाणुरहित करण्यासाठी उच्च तापमान आणि अल्ट्रावायलेट लाइटसारख्या उपकरांचा उपयोग करणार आहे. या नोटा 14 दिवसांपर्यंत मुद्रा प्रचलन पासून वंचित असतील. सेंट्रल बँकेचे डेप्युटी गवर्नर फैन युफेई यांनी सोंगितले की, नव्या नोटांमध्ये 600 बिलियन युआन आहे, जे जवळपास 85.6 बिलियन डॉलर इतके असते. आणि त्यांना चीनमध्ये 17 जानेवारीपासून चलनात आणले आहे.

चीन इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानात सर्वात पुढे आहे. ज्यामध्ये काही स्कॅनरही सामिल आहेत. जे ग्राहकांना या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी सुलभतेने बनवले गेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here