अदीस अबाबा : चीनकडून तयार करण्यात आलेल्या टाना बेल्स नंबर १ साखर कारखान्यात उत्पादन सुरू झाले असल्याची माहिती इथियोपिया शुगर कॉर्पोरेशनने (ईएससी/ ESC)दिली. ईएससीने सांगितले की, CAMC इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेडने (CAMCE) उभारलेल्या साखर कारखान्यात गेल्या अनेक महिन्यांच्या तयारीनंतर गुरुवारी सफेद साखरेचे उत्पादन सुरू करण्यात आले. टाना बेल्स नंबर १ साखर योजनेपासून प्रतीदिन जवळपास १२००० मेट्रिक टन ऊस गाळप आणि सुमारे १००० मेट्रिक टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.
इथियोपियाच्या उत्तरेकडील अमहारा क्षेत्रात टाना बेल्स नंबर १ साखर कारखान्याची निर्यमिती २०१२ मध्ये सुरू करण्यात आली होती. याची उभारमी १८ महिन्यांत करण्याचे नियोजन होते. मात्र, प्रत्यक्षात अपेक्षेनुसार काम पुढे सरकले नाही. २०१७च्या अखेरपर्यंत प्रकल्पाच्या केवळ ६० टक्के काम पूर्ण होऊ शकले. सीएएमसीईने सप्टेंबर २०१९ मध्ये साखर प्रकल्प स्वीकारून त्याची उभारणी सुरू केली. ईएससीने सांगितले की, टाना बेल्स नंबर १ साखर कारखान्यात सध्या इथियोपियाचे आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या अखेरपर्यंत २०००० मेट्रिक टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. हे आर्थिक वर्ष ७ जुलै रोजी समाप्त होईल.