50,000 टन कच्च्या साखर खरेदीसाठी चीनचा भारताशी करार

नवी दिल्ली : चीनने 50,000 टन कच्ची साखर खरेदी करण्यासाठी भारताशी सामंजस्य करार केला असल्याचे भारतातील उद्योग अधिकार्‍याने सांगितले. हा करार भारत-चीन व्यापार बैठकी वेळी करण्यात आला. धामपूर साखर कारखाना चीनमधील चार रिफायनरीजमध्ये साखर निर्यात करणार असल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले.

चीन जगभरातून कच्चीसाखर घेवून ती शुद्ध करुन स्थानिकरित्या विक्री करतो. यंदा (2019-20) चीनमध्ये 5 दशलक्ष टन साखरेची कमी आहे.  चीन हा जगातील सर्वात मोठा साखर आयात करणारा देश असून त्यानंतर इंडोनेशियाचा नंबर लागतो. 2019-20 मध्ये चीन 10 दशलक्ष टन साखर उत्पादन करणार आहे, चीनला दरवर्षी 15 दशलक्ष टन साखर लागते. भारतात 14.2 दशलक्ष टन अतिरिक्त साखर असल्यामुळे साखरेची निर्यात करणे भारतासाठी आवश्यक आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here