चीन : इथेनॉलच्या वापरात २०२२ मध्ये घट होण्याची शक्यता

80

चीनमध्ये या वर्षी इथेनॉल मिश्रणाचा दर १.८ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यात असल्याचे USDA फॉरेन अॅग्रिकल्चरल सर्व्हिसने ग्लोबल अॅग्रिकल्चरल इन्फॉर्मेशन नेटवर्कमध्ये दाखल केलेल्या अहवालात म्हटले आहे. जैवइंधन धोरणासाठी यापूर्वी जाहीर केलेले योजनांचे पाठबळ कमी झाल्याचे कारण यात नमुद करण्यात आले आहे. चीनने २०२० पर्यंत देशभरात ई १० धोरण राबविण्याची योजना जाहीर केली होती. अधिकृत ई १० धोरणानुसार, वास्तविक मिश्रणाचे दर भिन्न आणि लक्षणीयरित्या कमी असतात. ई १० धोरण राबविलेल्या ठिकाणीही अशीच स्थिती असते. याबाबत GAIN च्या अहवालानुसार चीन ई ५ च्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकतो असे म्हटले आहे. मात्र, सरकारी स्तरावरुन त्याच्या दुप्पट, ई १० धोरण राबविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

चीनमध्ये यावर्षी ११.८५ अब्ज लिटर (३.१३ अब्ज गॅलन) इथेनॉलचा वापर होणे अपेक्षा आहे. यामध्ये ३.८०७ अब्ज लिटर इंधन इथेनॉलचा समावेश आहे. गेल्या वर्षी, २०२१ मध्ये इंधन इथेनॉलचा एकूण वापर ११.३९१ अब्ज लिटर तर त्याआधी २०२० मध्ये १०.५३२ अब्ज लिटर करण्यात आला होता. जर चीनने २०२० पर्यंत ई १० मिश्रण कार्यक्रम पूर्ण केला असता, तर देशात १९ अब्ज लिटर इंधन इथेनॉल वापरले गेले असते. पाचपट अधिक वापर झाला असता, असे अनुमान अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. यावर्षी सरासरी १.८ टक्के इथेनॉल इंधन मिश्रण अपेक्षीत आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण १.९ टक्के इतके होते. तर त्यापूर्वी, २०२० मध्ये २ टक्के इथेनॉल मिश्रण करण्यात आले होते. देशात सध्या २२ इंधन इथेनॉल रिफायनरी आहेत. त्यांची उत्पादन क्षमता ७.७२ अब्ज लिटर असल्याचा अंदाज आहे. यंदा या क्षमतेचा ४९ टक्के वापर होण्याची शक्यता आहे. यंदा देशांतर्गत इथेनॉल उत्पादन ११.८५ अब्ज लिटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी पेक्षा हे उत्पादन अधिक असेल. २०२१ मध्ये १०.५८ अब्ज लिटर उत्पादन करण्यात आले होते. इंधन इथेनॉलचे उत्पादन यावर्षी ३.३९१ अब्ज लिटरवरून ३.८०४ अब्ज लिटरपर्यंत पोहोचेल अशी शक्यता आहे. मात्र, २०२० च्या तुलनेत ते कमी असेल. इंधन इथेनॉल उत्पादनासाठी मक्का हाच यंदा मुख्य कच्चा माल आहे. त्याचा ४.६९४ दशलक्ष मेट्रिक टन वापर होईल अशी अपेक्षा आहे. याशिवाय इथेनॉल उत्पादकांकडून ३.१९९ दशलक्ष मेट्रिक टन तांदूळ, १.४६९ दशलक्ष मेट्रिक टन कसावा आणि ९६,००० मेट्रिकन टन गव्हाचा वापर केला जाऊ शकेल. चीनकडून १० दशलक्ष लिटर इथेनॉल आयात केली जाईल. त्यात ५ दशलक्ष लिटर इंधन इथेनॉलचा समावेश असेल असे अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here