चीनमधील गुंतवणूकदार घानामध्ये सर्वात मोठा साखर कारखाना स्थापन करणार

अक्रा : चीनमधील गुंतवणूकदार घानामध्ये सर्वात मोठा साखर कारखाना स्थापन करणार आहेत. चीनमधील गुंतवणूकदारांनी बोनो क्षेत्रातील बांदा जिल्ह्यातील बुई डॅम एन्क्लेव्हमध्ये देशातील सर्वात मोठा साखर कारखाना उभारणीची तयारी सुरू केली आहे. BUI पॉवर ॲथॉरिटी (BPA) चे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम्युअल कोफी डजमेसी यांनी सांगितले की, प्राधिकरणाने चीनमधील गुंतवणूकदारांसोबत कारखाना उभारणीबाबत एका सामंजस्य करारावर (एमओयू) हस्ताक्षर केले आहेत. डजमेसी यांनी सांगितले की, याच वर्षी,जून महिन्यात कारखान्याच्या उभारणीचे काम सुरू होईल. आणि हे काम २०२४ मध्ये पूर्ण केले जाईल. कारखान्याकडून निर्यात आणि देशांतर्गत वापरासाठी जवळपास ६,००,००० टन साखरेचे उत्पादन केले जाईल.

याचप्रमाणे प्राधिकरणाने ऊस पिक उत्पादनासाठी जवळपास १३,००० एकर जमिन Bui Sugar Limited, Fawoman मध्ये गुंतवणूकदारांकडे सोपविली आहे. कंपनीने आधीच जवळपास २५० हेक्टरमध्ये ऊस लागवड केली आहे. डजमेसी यांनी सांगितले की, ही योजना विभागात जवळपास ५०० लोकांना रोजगार संधी मिळवून देईल. यासोबतच स्थानिक ५,००० लोकांना अप्रत्यक्ष नोकऱ्या उपलब्ध होतील. बुई शुगर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक वेट हुआ यांनी सांगितले की, साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी ऊस शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here