ChiniMandi Exclusive: साखर प्रति क्विंटल 3000 रुपयाने विक्री शक्य : सरकारकडून लवकरच निर्णय – शेतकऱ्यांना अच्छे दिन

कोल्हापूर, 21 मे 2018 : साखर कारखान्यांना कमी दरात विक्री करावी लागणारी साखर आता 3000 रुपयाने विक्री होऊ शकते. सरकार लवकरच हा निर्णय जाहीर करेल अस जानकारांच् मत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार आहे. तर, कारखान्यांना दिलासा मिळणार आहे.

देशातील साखरेचे उत्पादन वाढल्यामुळे उसाला एफआरपी देणेही महामुश्‍किल झाले होते. यापार्श्‍वभूमीवर देशासह महाराष्ट्रातील विविध संघटना, पक्षांकडून साखरेला किमान 3200 रुपये दर मिळावा, अशी मागणी केली जात होती. केंद्र सरकारच्या कृषीमूल्य आयोगाने उसाची एफआरपी ठरविताना गृहित धरलेला 3200 रुपये दराची अमलबजावणी करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत झालेल्या बैठकीत केली होती.

साखरेचे प्रतिक्विंटलचे दर 3500 वरुन 2350 पर्यंत खाली आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कमही देता येत नव्हती. त्यामुळे, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी बैठक़ घेवून प्रतिक्विंटल साखरेला 3200 रुपये दर मिळावा अशी मागणी केली होती. यापार्श्‍वभूमीवर सरकार आता प्रतिक्विंटल साखर 3000 रुपयेने विक्री करण्याचे आदेश कारखान्यांना मिळू शकतो. याची अमलबजावणी लवकरच होईल अशी बाजारात चर्चा आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here