महाराष्ट्रात २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होणार

मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने २२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे खुली करण्याची घोषणा केली आहे. कोरोना विषाणूच्या फैलावाची धास्ती असल्याने चित्रपटगृहांसह ऑडिटोरियम, नाट्यगृहांसाठी एसओपी जारी करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत राज्य सरकारने चित्रपटगृहे, नाट्यगृहे, ऑडिटोरियम ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. क्षमतेपेक्षा ५० टक्के लोकांना बसण्यासा मनाई करण्यात आली आहे. थिएटरमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागेल. सॅनिटायझर वापरणे अनिवार्य आहे. फक्त पॅकबंद खाद्यपदार्थ विक्रीची अनुमती देण्यात आली आहे. कन्टेनमेंट झोनमधील चित्रपटगृहे बंद राहतील. शिवाय, थर्मल तपासणी केली जाणार आहे. चित्रपटगृहांतील एसी २४ ते ३० या टप्प्यावर असावा असेही निर्देश आहेत. लस घेतलेल्या व्यक्तीला चित्रपट पाहण्यास जाता येईल. तेथे लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here