खाजगी साखर कारखान्यांनीही ऊस थकबाकी भागवण्याचे मुख्यमंत्र्यांनी निश्‍चित करावे: शिरोमणी अकाली दलाची मागणी

चंदीगड : खाजगी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने ऊस उत्पादकांची 383 करोड व्याजासह थकबाकी भागवावी, अशी मागणी शिरोमणी अकाली दलाने (एसएडी) पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याकडे केली आहे.

शिरोमणी अकाली दलाचे नवनियुक्त शेतकरी संघटनेने अध्यक्ष सिकंदर सिंह मलूका यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी भलेही वित्त विभाग आणि शुगरफेड यांना ऊस शेतकर्‍यांना 299 करोड रुपये थकबाकी भागवण्यासाठी सांगितले होते, पण खाजगी साखर कारखान्यांना थकबाकी भागवण्याबाबत कोणतेही निर्देश देण्याचा प्रयत्न केलेला नाही, ही विचित्र गोष्ट आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टेंन अमरिंदर सिंह यांनी गुरुवारी सहकारी साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांना 299 करोड रुपये थकबाकीपैक़ी 149 करोड रुपये शुगरफेडने भागवावेत असे आदेश दिले आहेत. शुगरफेड, सहकारी खाजगी साखर कारखान्यांचा समुह आहे. राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत सांगितले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावर वित्त विभागाने सहकारी साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांची थकबाकी भागवण्यासाठी 150 करोड रुपये मंजूर केले आहेत. तर 149 करोड रुपयाची उर्वरीत रक्कम शुगरफेड भागवेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here