एफआरपी द्या, अन्यथा तोडी बंद पाडणार: महेश खराडे

सांगली : जिह्यात केवळ श्री दत्त इंडिया आणि निनाईदेवी या दोनच साखर कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे बिले दिली आहेत. उर्वरित कारखान्यांनी 2400 रुपये प्रतीटन पहिला हप्ता देण्याची तयारी केली आहे. जिह्यातील कारखान्यांनी मुद्दाम एक रकमी एफआरपी दिलेली नाही, या कारखान्यांनी एकरकमी एफआरपी प्रमाणे बिले द्यावीत अन्यथा तोडी बंद पाडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.

खराडे म्हणाले, आर्थिक अडचणी असत्या तर कोल्हापूर जिह्यातील कारखान्यांनीही एकरकमी एफआरपी दिली नसती. दत्त इंडिया व दालमिया या कारखान्यांनी हाथ आखडता घेतला असता. पण या कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी प्रमाणे बिले दिली आहेत. येत्या आठ दिवसांत या कारखान्यांनी एक रकमी एफआरपी शेतकऱयांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही खराडे यनी दिला आहे.

गळीत हंगाम सुरु होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. महापूर आणि अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादकांचे झालेले नुकसान लक्षात घेता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दर आंदोलनात हात आखडता घेतला होता. त्यामुळे सहाजिकच एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी असतानाही साखर कारखानदारांनी या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here