बंद साखर कारखाने गळीत हंगामात सुरू करण्याची मागणी

143

सहारनपूर: नुक्कड क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आयोजित बैठकीत गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या जिल्ह्यातील बिडवी तथा टोडरपूर साखर कारखाना सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून हे कारखाने बंद असल्याने या दोन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखान्यांना वाटून दिला जातो. त्यामुळे ऊस वेळेवर खरेदी केला जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.

शेतकऱ्यांनी सोमवारी फंदपुरीमध्ये राजकुमार चौधरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शेतकरी नेता अतुल फंदपुरी यांनी सांगितले की, यावर्षी जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढले आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगामात शेतकऱ्यांसमोर ऊस वेळेवर कारखान्याला पाठविण्याचे संकट आहे. त्यामुळे दोन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना आपला ऊस कमी दराने गुऱ्हाळघरे, क्रशरला पाठवावा लागतो. २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने बंद असलेले सर्व साखर कारखाने सुरू करण्याची घोषणा केली होती. भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष, गृहमंत्री अमित शहा यांनी सरसावा येथील जाहीर सभेत याचे आश्वासनही दिले होते. जर आमचे सरकार सत्तेवर आले तर एका महिन्यात दोन्ही कारखाने सुरू करू अशी घोषणा त्यांनी केली होती. मात्र, साडेचार वर्ष उलटली तरी काहीही झाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

दोन्ही बंद कारखाने सुरू करण्यासह ऊसाचा दर ४०० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी करण्यात आली. राठी खापचे अध्यक्ष धर्मपाल सिंह चौधरी यांच्यासह चौधरी संभू प्रसाद अध्यक्षस्थानी होते. चौधरी रामधन सिंह, चौधरी राजकुमार सिंह, चौधरी अमित प्रधान, चौधरी सोनू प्रधान, चौधरी प्रदीप, प्रधान इम्रान, नदीम, शकील ,आशीष नंबरदार, चौधरी ओमपाल सिंह आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here