मुंबई : महाराष्ट्रात आज वातावरणात बदल झाला आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर तापमानात घसरण नोंद झाली आहे. हवामान विभागाने सांगितले की, पश्चिमेकडील वाऱ्याचा प्रभाव राज्यात होत आहे. त्यामुळे पाऊस पडू शकतो. अशा स्थितीत पाऊस आणि थंड हवेमुळे महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमानात ३ ते ४ डिग्री सेल्सिअस घसरण होऊ शकते.
दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला थंडीपासून दिलासा मिळणार नाही. आता पाऊस पडल्यास थंडी वाढू शकते. हवामान विभागाने सांगितले की, या आठवड्यात थंडी आणि धुक्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात यापासून थोडा दिसाला मिळू शकतो. त्यानंतर तापमानात वाढ होईल. मुंबईत आज कमाल तापमान २८ तर किमान तापमान १६ डिग्री राहण्याची शक्यता आहे. तर पुण्यात कमाल ३१ आणि किमान १४ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. नागपुरमध्ये किमान ३१ आणि कमाल १५ तापमान असेल. नाशिक आणि औरंगाबादमध्येही अशीच स्थिती राहील.