युपी: मुख्यमंत्री योगी यांनी ऊसाची एफआरपी वाढीबद्दल मानले पंतप्रधानांचे आभार

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय कॅबिनेटद्वारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उसाचा योग्य तथा लाभदायी मूल्य (एफआरपी) वाढविल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. त्यांनी ही वाढ म्हणजे ऊस उत्पादकांच्या स्वावलंबन ते समृद्धी यात्रेला एक नवीन आयाम मिळाल्याचे म्हटले आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, केंद्रीय कॅबिनेटद्वारे साखर हंगाम २०२३-२४ मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतच्या उच्च योग्य तथा लाभदायी दराला (एफआरपी) ३१५ रुपये प्रती क्विंटल करण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी स्वावलंबनातून समृद्धीच्या वाटेवर नेणारा आहे. आज आनंदी शेतकरी नव्या भारताची ओळख आहेत.

मोदी सरकारने देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही घोषणा करताना ऊसाची एफआरपी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. २०२३-२४ हंगामासाठी एफआरपी १० रुपये प्रती क्विंटल वाढवून ३१५ रुपये प्रती क्विंटल केले आहे. ही आतापर्यंतची उसाची सर्वाधिक किंमत आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल. साखर कारखान्यातील कामगारांनाही याचा लाभ मिळेल. या निर्णयाचा लाभ ५ कोटी शेतकरी आणि कारखान्याच्या कामगारांना लाभ मिळेल.

मोदी सरकारने शेतकऱ्यांना युरियाची उपलब्धता वाढविण्यासाठी युरिया अनुदान योजना सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. पॅकेजमध्ये तीन वर्षांसाठी युरिया अनुदान देवून ३.७० लाख कोटी रुपये मंजूर करण्यास मान्यता दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here