हरियाणा: किडीच्या हल्ल्यांमुळे ऊसाचे को-०२३८ वाण कमी होण्याची शक्यता

कर्नाल : उच्च ऊस आणि साखर उत्पादनासाठी राज्यात २०११ पासून वर्चस्व गाजवल्यानंतर, ऊसाच्या Co-०२३८ प्रजातीचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी या वाणावर वारंवार होणाऱ्या किडीच्या आक्रमणामुळे चिंतेत आहेत. को-०२३८ जातीच्या ऊसाच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या सुमारे ७० टक्के क्षेत्र को-०२३८ जातीच्या लागवडीखाली आहे. परंतु टोप बोरर किडी आणि लाल-सड रोगाच्या आक्रमणामुळे उत्पादन कमी होऊ शकते. चांगल्या उत्पादनासाठी शेतकरी ऊसाच्या इतर जातींचा शोध घेत आहेत.

द ट्रिब्यूनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, हरियाणातील प्रगतीशील शेतकरी आणि ऊस संघर्ष समितीचे राज्य उपाध्यक्ष रामपाल चहल म्हणाले, “मी दरवर्षी या प्रजातीचा ऊस २० एकरांमध्ये लागवड करायचो. परंतु टॉप बोअर किडीच्या सततच्या आक्रमणामुळे मला हे क्षेत्र सहा एकरांपर्यंत कमी करावे लागले. मी ऊस संशोधन संस्था, प्रादेशिक केंद्र व इतर संस्थांच्या संशोधकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार उसाच्या इतर जातींची लागवड सुरू केली आहे. शेतकऱ्यांना हे वाण वाचवण्यासाठी, किडीपासून मुक्ती मिळवण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे.

प्रादेशिक ऊस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस. के. पांडे म्हणाले की, ०२३८ ही प्रजाती टॉप बोअरर कीड आणि लाल सड रोगास अधिक संवेदनशील बनली आहे, आम्ही शेतकर्‍यांना कीड आणि रोगापासून मुक्त कसे व्हावे याबद्दल प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहोत. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार ड्रेंचिंगमध्ये क्लोराँट्रानिलीप्रोलचा वापर करावा आणि ट्रायकोग्रामा जॅपोनिकम नियमित अंतराने शेतात सोडावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here