‘को-जेन इंडिया’तर्फे ‘बिद्री’ला सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा विशेष पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. ‘बिद्री’च्या सहवीज प्रकल्पाला सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प म्हणून देशपातळीवरील विशेष पुरस्कार जाहीर झाला. मागील वर्षीही कारखान्यास सर्वोत्कृष्ट को-जनरेशन प्रकल्पाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने को-जनरेशन प्रकल्प राबविणाऱ्या आदर्शवत संस्थांना पुरस्काराने सन्मानित केले जाते.

सहकार क्षेत्रातील प्रकल्पांतर्गत बॉयलर ८७ कि.ग्रॅ./ सेमी स्क्वेअरपेक्षा जास्त क्षमता गटामधून २०२२-२३ चा उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प हा विशेष पुरस्कार ‘बिद्री’ला मिळाल्याचे तसेच वैयक्तिक गटातून कारखान्याचे प्रोजेक्ट मॅनेजर महेश सलगर यांना बेस्ट को-जनरेशन मॅनेजर हा पुरस्कार जाहीर झाल्याचे महासंचालक संजय खताळ यांनी पत्राद्वारे कारखाना प्रशासनाला कळविले आहे. १६ सप्टेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खा. शरद पवार भूषविणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here