सहकारी समित्या सरकारच्या GeM पोर्टलच्या माध्यमातून करणार खरेदी, कॅबिनेटचा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने डिजिटल खरेदी पोर्टल सरकारी ई मार्केटप्लेस (GeM) वर सहकारी समित्यांना खरेदीदारांच्या माध्यमातून जोडण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे सहकारी समित्या GeMच्या माध्यमातून खरेदी करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारी ई मार्केटप्लेस वर खेरीदेदारांच्या रुपात आतापर्यंत सरकारी विभाग, मंत्रालये, पल्बिक सेक्टर युनिट्स सहभागी होऊ शकत होते. मात्र, आता सहकारी समित्यांना यात समाविष्ट करून घेण्यात आले आहे.

फायनान्शिअल एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, यामुळे सहकारी समित्यांमध्ये पारदर्शकता येईल. त्यांना जेम्सच्या बाजारपेठेचा लाभ मिळेल. त्यावर अधिक खरेदीदार मिळतील. सद्यस्थितीत जेमवर खासगी क्षेत्रातील खरेदीदार उपलब्ध नाहीत. तर सरकारी क्षेत्रातील आणि खासगी क्षेत्रातील सेगमेंटमधझील असू शकतात. ठाकूर म्हणाले की, या निर्णयाचा लाभ ८.५४ लाखांहून अधिक नोंदणीकृत सहकारी समित्या आणि त्यांच्या २७ कोटी सदस्यांना लाभ मिळेल. यातून पारदर्शकतेला चालना मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here