चालू आर्थिक वर्षात फेब्रुवारी 2024 पर्यंत कॅप्टिव्ह आणि व्यावसायिक खाणींमधून कोळशाचे उत्पादन आणि पाठवणी यात अनुक्रमे 27% आणि 29% वाढ

कॅप्टिव्ह आणि व्यावसायिक खाणींमधून कोळशाचे उत्पादन आणि पाठवणी यात मागील महिन्याच्या आणि वर्षाच्या तुलनेत वाढ होत आहे. 1 एप्रिल 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत कॅप्टिव्ह आणि व्यावसायिक कोळसा खाणींमधून एकूण कोळसा उत्पादन आणि पाठवणी अनुक्रमे 126.80 मेट्रिक टन आणि 128.88 मेट्रिक टन होते, जे आर्थिक वर्ष 22-23 मधील याच कालावधीच्या तुलनेत अनुक्रमे 27.06% आणि 29.14% ची प्रभावी वाढ दर्शवते. ही वाढ या क्षेत्रातील वर्धीत कार्यक्षमता आणि मजबूत लॉजिस्टिक नेटवर्क प्रतिबिंबित करते.

29 फेब्रुवारी 2024 पर्यंत, कोळसा उत्पादक खाणींची एकूण संख्या 54 होती, त्यापैकी 35 ऊर्जा क्षेत्रासाठी, 11 अ-नियंत्रित क्षेत्रासाठी तर 8 कोळशाच्या विक्रीसाठी निर्धारित करण्यात आल्या होत्या. व्यावसायिक कोळसा लिलावाअंतर्गत 91 खाणींचा यशस्वीपणे लिलाव करण्यात आला आहे, त्यापैकी 7 खाणींनी आधीच कोळसा उत्पादन सुरू केले आहे.

फेब्रुवारी 2024 मध्ये एकूण कोळशाचे उत्पादन आणि पाठवणी अनुक्रमे 14.85 मेट्रिक टन आणि 12.95 मेट्रिक टन होते, ज्यात अनुक्रमे 37% आणि 33% वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच महिन्यात एकूण कोळशाचे उत्पादन आणि पाठवणी अनुक्रमे 10.85 मॅट्रिक टन आणि 9.72 मॅट्रिक टन होते. सरासरी दैनंदिन कोळसा उत्पादन आणि पाठवणी दर अनुक्रमे 5.12 लाख टन आणि 4.46 लाख टन प्रति दिन होता. या आकडेवारीवरून या क्षेत्राची सातत्यपूर्ण कामगिरी दिसून येते.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here