कोळसा पीएसयूने जानेवारी २०२४ पर्यंत वार्षिक भांडवली खर्चाच्या ९५.८३ टक्के लक्ष्य गाठले

नवी दिल्ली : कोळसा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कोळसा पीएसयू भारतीय अर्थव्यवस्थेच्या परिवर्तनात मदत आणि योगदान देण्यासाठी भांडवली खर्चात (कॅपेक्स) आघाडीवर आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये, कोळसा सीपीएसआयने कॅपेक्स उद्दिष्टे चांगल्या प्रकारे साध्य केली आहेत. आर्थिक वर्ष २१-२२ मध्ये, सीआयएल आणि एनएलसीआयएलने त्यांच्या उद्दिष्टाच्या अनुक्रमे १०४.८८ टक्के आणि १२३.३३ टक्के गाठले होते. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये अशाच कामगिरीची पुनरावृत्ती झाली आहे. यात दोन्ही कोळसा सीपीएसईने त्यांच्या लक्ष्याच्या सुमारे ११३ टक्के साध्य केले.

कोळसा मंत्रालयाचे २०२३-२४ साठी भांडवली खर्चाचे लक्ष्य २१,०३० कोटी रुपये आहे. जानेवारी २०२४ पर्यंत यातील२०,१५३ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, जे वार्षिक उद्दिष्टाच्या दिशेने ९५.८३ टक्के प्रगती आहे. चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये जाताना, सीआयएल आणि एनएलसीआयएल हे दोघेही पुन्हा त्यांचे कॅपेक्स लक्ष्य ओलांडण्याच्या मार्गावर आहेत. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांत मोठ्या कॅपेक्स गुंतवणुकी पूर्ण झाल्यामुळे, वार्षिक कॅपेक्स लक्ष्य ओलांडले जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाची गती आणखी वाढेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here