भारतामध्ये कोका-कोला शीत पेयांमधील साखरेचे प्रमाण कमी करणार

112

नवी दिल्ली : कोका कोलाचे भारत आणि दक्षिण पश्‍चिम एशिया अध्यक्ष टी कृष्णकुमार यांनी सांगितले की, गेल्या 8-10 महिन्यांमध्ये आम्ही थम्स अप आणि माजा सारख्या ब्रॅन्डमधील साखरेचे प्रमाण योग्य तर्‍हेने कमी केले आहे. आम्ही आगामी दोन वर्षात साखरेच्या प्रमाणाला सहा ग्रॅम पेक्षाही खाली आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. यावर पूर्वीच कामाला सुरुवार केली आहे. साधारणपणे, कोका कोला च्या 330 मिलीलीटर्‍या कॅनमध्ये 35 ग्रॅम अर्थात जवळपास 7 चमचे साखर असते. कोका कोलाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स क्वीन यांनी सांगितले की, कोका कोला इंडिया 2019 मध्ये 1 बिलियन यूनिट विक्रीचा माइलस्टोन झाल्यानंतर पांचवा सर्वात मोठा बाजार बनला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here