COFCO इंटरनॅशनल ची ब्राझीलमध्ये इथेनॉल उत्पादनाच्या विस्तारासाठी गुंतवणूक

पुढच्या हंगामात इंधन पुन्हा एकदा साखरेच्या तुलनेत चांगला परतावा देण्याची चिन्हे दिसत असल्याने, चायनीज कमोडिटीज कंपनी COFCO इंटरनॅशनल इथेनॉल उत्पादनाच्या विस्तारासाठी ब्राझील मध्ये ऊस प्रसंस्करण संयंत्रांसाठी गुंतवणूक करत आहे.

कंपनीच्या सॉफ्ट कमोडिटीज च्या जागतिक प्रमुख मार्सलो डी एंड्रेड ने डेटाग्रो 20I9 साखर आणि इथेनॉल अंतरराष्ट्रीय संमेलना दरम्यान बोलताना ते म्हणाले की, COFCO ब्राझीलमध्ये आपल्या चार पैकी तीन संयंत्रांमध्ये नवे डिस्टीलेशन कॉलम्स आणि कर निर्माण करत आहे, जो इथेनॉलची क्षमता वाढवतो.

साखरेच्या किमतीत कोणतीही महत्वाची सुधारणा नाही आणि इथेनॉल उत्पादनामुळे कंपनीला अधिक फायदा होऊ शकतो, म्हणून या गुंतवणूकीत कंपनी इथेनॉल उत्पादनावर अधिक जोर देत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या घसरणाऱ्या किंमतीत ब्राझीलला इथेनॉल उत्पादनावर अधिक जोर देण्यास मदत केली आहे. साखरेेच्या अतिरिक्त उत्पादनाच्या किंमती कमी केल्या आहेत आणि कारखान्यांनी गैेसोलीनच्या किंमती वाढल्यामुळे आपल्या आवडत्या इथेनॉल उत्पादनाकडे मार्ग वळवला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here