‘नॅशनल को-जनरेशन पारितोषिक 2023’ पुरस्कारांची घोषणा

पुणे : को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे (को-जन इंडिया ) सलग दुसऱ्या वर्षी देशपातळीवर सहवीज निर्मिती प्रकल्प तसेच त्यामध्ये कार्यरत अधिकारी यांच्यासाठीच्या ‘नॅशनल को-जनरेशन पारितोषिक 2023’ अंतर्गत विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. ‘बेस्ट को-जनरेशन प्रकल्प’ श्रेणीमध्ये निराणी शुगर्स लिमिटेड (कर्नाटक), बलरामपुर चीनी मिल्स (अकबरपुर युनिट, उत्तर प्रदेश), श्री दत्त सहकारी साखर कारखाना (शिरोळ) आणि चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना (चिकोडी, कर्नाटक) यांना प्रथम क्रमांक मिळवला आहे.

2022 पासून सुरु करण्यात आलेले National Cogeneration Awards व्दारे सहविज निर्मिती प्रकल्पांमधून पारितोषिकांच्या वैयक्तिक श्रेणी अंतर्गत सर्वोत्कृष्ट को-जन मॅनेजर, सर्वोत्कृष्ट इनस्ट्रुमेंटेशन मॅनेजर किंवा इनचार्ज, सर्वोत्कृष्ट डी.एम / डब्ल्यु.टी. पी. मॅनेजर किंवा इनचार्ज आणि सर्वोकृष्ट इलेक्ट्रीकल मॅनेजर यांची निवड निश्चित करण्यात आलेली आहे. यामध्ये 16 विजेत्यांचा समावेश आहे. तसेच संस्थात्मक श्रेणी अंतर्गत प्रथम 3 सहविज निर्मिती प्रकल्पांना सुवर्ण, रौप्य आणि कास्य चषक देवून गौरवण्यात येणार आहे. या श्रेणीत एकूण 12 विजेत्यांचा समावेश आहे.

एकुण 28 पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. सहकारी व खाजगी क्षेत्रातील प्रकल्प अशी   वर्गवारी करुन त्यांना स्वतंत्रपणे पारितोषिके दिली जाणार आहेत. तसेच छोटे व मोठे प्रकल्प यांचे देखील स्वतंत्रपणे मुल्यमापन व्हावे म्हणून बॉयलर प्रेशर 87 बार पेक्षा “अधिक” आणि “कमी” असा क्षमता आधारित निकष लावून त्यांची निवड करण्यात आली आहे. दुसऱ्या वर्षी सलग पुनःश्च विजेते झालेल्यांना नियमित पारितोषिकांच्या ऐवजी खास श्रेणीतील पारितोषिक विजेते म्हणून सन्मानीत करण्यात येईल.

हा पारितोषिक वितरण समारंभ हॉटेल टीप टॉप इंटरनॅशनल वाकड, पुणे येथे शनिवार, दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे. या पाठोपाठ Integrated Strategy for Green Renewable Energy for Sugar Complexes ( साखर कारखाना संकुलांकरीता हरीत नूतनीकरणीय उर्जेचे एकात्मिक धोरण) या सदराखाली महत्वपुर्ण परिषद तथा चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये Biofuel Program (जैविक इंधन कार्यक्रम) Blo CNG Sustainability (जैविक गॅस प्रकल्पांची शाश्वता), Integrated Blo Refinery (एकात्मिक जैव रिफायनरी), ‘Synergizing Hydrogen Production with Cogeneration’ (सहविज निर्मिती आणि हायड्रोजन निर्मिती मधील समन्वय) आणि सौर उर्जा या विषयांवर सदर परिषदेत महत्वाच्या माहितीची देवाण घेवाण व चर्चा होईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पारितोषिक वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांची उपस्थितीची खातर जमा होणे प्रलंबीत आहे. को-जन इंडियाचे अध्यक्ष, खा. शरद पवार  तथा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे.  यावेळी को-जन इंडियाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, डी. डी. जगदाळे, सहसचिव (बायोमास) आणि अजय यादव, सहसचिव (हायड्रोजन व रेड्युलेटरी अफेअर्स), नवीन व नूतनीकरणीय उर्जा मंत्रालय (MNRE)  यानाही कार्यक्रमास आमंत्रित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here