तुरुंगातही आता गोडवा: कैदी करणार ऊसाची शेती

कोयंबटूर(तामिळनाडू) : तुरुंगातील कैद्यांमध्ये शेती करण्याचा कल वाढवण्याच्या दृष्टीने कोयंबटूर तुरुंगाच्या तुरुंग अधिकार्‍यांनी ओंडीपुदुर मध्ये ओपन एयर जेल परिसरातमध्ये ऊसाची शेती सुरु करण्याची योजना तयार केली आहे. याची पेरणी मार्चच्या शेवटपर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. जेणेकरुन 2021 च्या पोंगल पर्यंत ऊसाची तोडणी होवू शकेल.

तुरुंग अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, ओडीपुदुर मध्ये ओपन एयर जेल परिसर 30 एकरमध्ये पसरलेला आहे. यामध्ये जवळपास 1.5 एकर जमिन ऊसाच्या शेतीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. 2020 च्या पोंगलमध्ये तिरुची तुरुंगामध्ये केलेली ऊसाची शेती यशस्वी झाली. तिरुची चे यश पाहून आता कोयंबटूर तुरुंग विभागही याप्रकारचे काम करण्याच्या प्रयत्नात आहे.

कोयंबटूर तुरुंगाचे डीआयजी जी शनमुगा सुंदरम यांनी सांगितले की, साधारणपणे जानेवारीपासून मार्च दरम्यान शेतात ऊसाची लागवड केली जाते आणि डिसेंबर ते मार्चपर्यत ऊस तोडणी होते. राज्यातील काही जिल्ह्यात ऊसाची लागवड आणि तोडणी चे खास सिजन आहेत. म्हणून आम्ही या महिन्यापासूनच ऊसाच्या शेतीची योजना बनवली आहे. यासाठीची माती आणि पाण्याच्या परीक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे.

सुंदरम म्हणाले की, तामिळनाडू सरकार पोंगल मध्ये प्रत्येक वर्षी भेटवस्तू देण्यासाठी शेकडो टन ऊस खरेदी करते. तुरुंग विभागही आपला ऊस राज्य सरकारला देवू शकतो. तुरुंगातील ऊसाच्या दर्जाबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. तसेच या ऊसाची किंमतही कमी असेल. जर इथे उत्पादन अधिक असेल तर आम्ही तुरुंग बाजाराच्या माध्यमातून ऊस विकू शकतो. ऊसा शिवाय या तुरुंग परिसरामध्ये 900 नारळाची झाडेही लावण्यात येणार आहेत आणि ओडीपुडुर ओपर एयर जेल मध्ये खाद्य तेलांचे उत्पादनही घेतले जाणार आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here