जागतिक दर घसरल्याने भारतीय कारखान्यांचा साखर निर्यात करारास थंड प्रतिसाद : इस्मा

नवी दिल्ली : साखरेच्या जागतिक किंमतीत घसरण झाल्याने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारतीय साखर कारखान्यांनी पुढील निर्यात करार केलेले नाहीत. उद्योगाची शिखर संस्था इस्माने ही माहिती दिली.

इस्माने सांगितले की, स्थानिक स्तरावर ऊस दरात वाढ आणि साखरेच्या देशांतर्गत किंमतीमुळे साखर उत्पादनाचा जास्त खर्च पाहता साखर कारखानदार जेव्हा किमती २१ सेंट प्रती पाऊंडपर्यंत पोहोचतील तेव्हाच निर्यातीचे करार करण्यास जागतिक बाजारपेठेत प्राधान्य देतील. आता हे दर २० सेंट (जवळपास १२.७३ रुपये) प्रती पाऊंड (जवळपास ०.४५ किलो) या स्तरापेक्षा कमी आहेत.

साखर उत्पादकांच्या मुख्य संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले की, भारतीय साखर कारखान्यांनी आधीच ३५ लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत. जेव्हा साखरेच्या किमती २०-२१ सेंट प्रती पाऊंडवर होत्या, तेव्हा हे करार करण्यात आले आहेत. साखर हंगाम ऑक्टोबर ते सप्टेंबर अशा कालावधीत चालतो.

भारतीय साखर कारखाना संघाने (इस्मा) सांगितले की, सध्या कच्च्या साखरेच्या किमती जागतिक स्तरावर २० सेंटपेक्षा कमी आहेत. आता जवळपास त्या १८.६ सेंट प्रती पाऊंडवर आल्या आहेत. परिणामी, भारतीय कारखाने निर्यात करार करण्यास पुढे येत नसल्याचे दिसते.

साखरेच्या ३५ लाख टन निर्यातीचे करार महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखान्यांनी केले आहेत. देशाच्या पश्चिम आणि दक्षिण विभागाच्या तुलनेत उत्तर भारतात एक्स मिल दर अधिक आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कोणतेही निर्यात करार करण्यात आलेले नाहीत.

इस्माने दिलेल्या माहितीनुसार २०२१-२२ या हंगामात नोव्हेंबरपर्यंतच्या पहिल्या दोन महिन्यात देशात साखरेचे उत्पादन ४७.२१ लाख टनापर्यंत झाले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीपर्यंत ४३.०२ लाख टन उत्पादन झाले होते. पश्चिम भारतात उसाचे गाळप लवकर सुरू झाल्याने आतापर्यंत उत्पादन अधिक झाले आहे.

महाराष्ट्रात साखर उत्पादन २०.३४ लाख टन झाले आहे. गेल्यावर्षी समान कालावधीत ते १५.७९ लाख टन झाले होते. तर उत्तर प्रदेशामध्ये गेल्यावर्षीच्या १२.६५ लाख टनाच्या तुलनेत १०.३९ लाख टन म्हणजेच कमी साखर उत्पादन नोव्हेंबर अखेर झाले आहे. कर्नाटकमध्ये मात्र उत्पादन ११.११ लाख टनाच्या तुलनेत वाढून १२.७६ लाख टन झाले आहे. सर्व राज्यात गाळप गतीने सुरू असल्याची माहिती इस्माने दिली.

इस्माने सांगितले की, इथेनॉल उत्पदकांनी २०२१-२२ या हंगामासाठी ४१४ कोटी लिटरच्या पुरवठ्याच्या निविदा तेल वितरण कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. तेल वितरण कंपन्यांनी (ओएमसी) आणखी १४२ कोटी लिटर इथेनॉल उत्पादनसाठी निविदा जारी केल्या आहेत. त्यासाठी बोली लावण्याची मुदत तीन डिसेंबरपर्यंत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here