बिलाई, बिजनौर साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी नाराज

बिजनौर : शेतकऱ्यांना ऊस बिले न देणाऱ्या बिलाई आणि बिजनौर साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी उमेश मिश्रा यांनी खडसावले. लवकर शेतकऱ्यांना पैसे न दिल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला.
ऊस बिलांबाबत आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, गाळप हंगाम समाप्त होऊन खूप दिवस उलटले आहेत. नियमानुसार शेतकऱ्यांना पंधरा दिवसांत पैसे देणे गरजेचे आहे. पैसै न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. अनेक संघटना आंदोलनाचा इशारा देत आहेत. कारखान्यांचे इतर व्यवसायही आहेत असे जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले. जर साखर विक्रीतून पुरेसे पैसे उपलब्ध होत नसतील तर इतर व्यावसायांतून शेतकऱ्यांना पैसे द्यावेत.

जिल्हाधिकारी म्हणाले, धामपूर ग्रुपच्या इतर जिल्ह्यातील कारखान्यांनी ९० टक्क्यांपर्यंत पैसे दिले आहेत. तर आपल्या जिल्ह्यात आतापर्यंत फार कमी ऊस बिले दिलेली आहेत. बिलाई आणि बिजनौर साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना त्यांनी कोणत्याही परिस्थितीत तातडीने पैसे देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह, परोपकार सिंह, इसरार अहमद आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here