शेतकऱ्यांना तातडीने ऊस थकबाकी देण्याचे आयुक्तांचे कारखान्यांना निर्देश

उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयुक्त रोशन जेकब यांनी लखीमपूर आणि विभागातील इतर साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. कारखान्याच्या अधिकाऱ्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी त्वरीत द्यावी असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी आयुक्तांनी बजाज समुहाचा गोला साखर कारखाना, पलिया, खंभारखेडा तथा ऐरातील गोविंद शुगर मिलच्या अध्यक्षांसमवेत आढावा घेतला.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, विभागीय आयुक्तांनी सांगितले की, शेतकऱ्यांची जी थकबाकी साखर कारखान्यांकडे आहे, ती कोणताही उशीर न करता तत्काळ दिली जावी. यामध्ये बजाज हिंदूस्थान साखर कारखाना युनिट गोला, पलिया तथा खंभारखेडा, गोविंद शुगर मिल्स लखिमपूरचे प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी नव्याने सुरू होत असलेल्या गळीत हंगामाच्या तयारीबाबतही आढावा घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here