मुख्यमंत्र्यांसमोर कुशीनगर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे गाऱ्हाणे

कुशीनगर : उत्तर प्रदेश गोसेवा आयोगाचे उपाध्यक्ष यशवंत ऊर्फ अतुल सिंह यांनी लखनौस्थित मुख्यमंत्री निवासमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. कप्तानगंज येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. कप्तानगंज साखर कारखाना परिसरात ऊस शिल्लक असताना अचानक बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अचानक कारखाना बंद पडला असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत ‌ अद्याप शेकडो एकर ऊस शेतात उभा आहे. आता कोणत्या कारखान्याला ऊस पाठवावा हे शेतकऱ्यांना समजलेले नाही.

कप्तानगंज साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. सध्या वसंतकालीन ऊस पेरणी सत्र सुरू झाले आहे. ऊस तोडणी झाली असती तर शेत रिकामे होऊन वेळेवर पेरणी झाली असती असे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना सांगितले. उसाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ आली आहे असे उपाध्यक्ष अतुल सिंह यांनी सांगितले ‌ त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिल्याचे उपाध्यक्ष सिंह म्हणाले. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.

जमिनीच्या एकत्रिकरणाचे आदेश
खड्डा : जिल्हाधिकाऱ्यांनी रामपूर गोहाना या गावातील जमीन एकत्रिकरण करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी अधिकाऱ्यांचा बंदोबस्त, मोजणी अधिकारी, सहायक अधिकारी यांसह चार अधिकाऱ्यांची टीम नियुक्त करण्यात आली आहे. रामपूर गोहानाचे सरपंच रामकृपाल कन्नौजीया यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोजणी, जमीन एकत्रिकरण प्रलंबित राहिल्याची तक्रार केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here