गळीत हंगाापूर्वी १५ दिवस कारखान्यांची देखभाल, दुरुस्ती पूर्ण करा: ऊस उद्योग मंत्री यतीश्वरानंद

डेहराडून : साखर कारखान्यांना तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत असे निर्देश ऊस विकास तथा साखर उद्योग मंत्री स्वामी यतीश्वरानंद यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिले. गाळप हंगामाच्या आधी पंधरा दिवस कारखान्यांतील देखभाल, दुरुस्तीची कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष द्यावे. तसेच शेतकऱ्यांचा सन्मान करण्याबाबत योजना बनवावी असे त्यांनी सांगितले.

मंत्री स्वामी यतीश्वरानंद यांनी विधानसभेतील आपल्या कक्षात ऊस गाळप हंगाम २०२१-२२ च्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी डोईवाला, किच्छा, नादेही, बाजपूर साखर कारखान्याचे व्यवस्थापक, मुख्य अभियंता उपस्थित होते. गाळप हंगामाची तयारी परिपूर्ण असली पाहिजे असे त्यांनी सांगितले. खर्चात कपात करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. कारखान्यातील मनुष्यबळाच्या कमतरतेबाबतही मंत्र्यांनी माहिती घेतली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकी देण्याच्या कामात गती आणण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी किच्छा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रुची मोहन रयाल, मुख्य अभियंता डी. सी. पांडे, आर. के. शर्मा, व्ही. एन. शंखवार, बाजपूर साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक प्रकाश चंद्र यांसह अधिकारी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here