साओ पाउलो : सरकारी एजन्सी Conab ने ब्राझीलमध्ये हंगाम २०२३-२४ मध्ये ऊस पिक गेल्या वर्षीपेक्षा ६.९ टक्के वाढून ६५२.९ मिलियन मेट्रिक टन होण्याची शक्यता वर्तवली आहे. Conab ने म्हटले आहे की, अनुकूल हवामानामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.
Conab ने सांगितले की, साखर उत्पादन ४०.९ मिलियन टन होण्याची अपेक्षा आहे. एक वर्षापूर्वीच्या तुलनेत हे उत्पादन ११.१ टक्के अधिक असेल. तर ऊसावर आधारित इथेनॉल उत्पादन ४.५ टक्के वाढून २७.७२ बिलियन लिटर होण्याचे अनुमान आहे.
हा सर्व अंदाज Conab च्या एप्रिलमधील पुर्वानुमानापेक्षा अधिक आहे. तेव्हा एजन्सीने ऊस पिक ६२७.१ मिलियन टन होण्याचे अनुमान व्यक्त केले होते. साखर उत्पादन ३८.७७ मिलियन टन आणि इथेनॉल उत्पादन २७.५ बिलियन लिटर उत्पादित केले जाईल असा अंदाज व्यक्त केला होत.