ऊस शेतकऱ्याच्या आत्महत्ये वर अखिलेश यादव आणि प्रियंका गाँधी यांनी साधला सरकारवर निशाणा

 

लखनऊ: उत्तर प्रदेश मध्ये ऊस शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी राजकारणाने डोके वर काढले आहे. पहिल्यांदा प्रियंका गांधी आणि आता अखिलेश यादव यांनी देखील या मुद्दयावर सरकार वर निशाणा साधला आहे. समाजवादी पार्टी (सपा) चे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शुक्रवारी सांगितले की, शेतकऱ्यांची अवस्था खराब आहे. मुजफ्फरनगर मध्ये सिसौली शहराच्या बुढ़ाना विधानसभा क्षेत्र मध्ये साखर कारखान्याने शेतकरी ओम पाल (55) यांचा ऊस घेण्यास नकार दिला. त्यांची ६ मुले आणि त्यांच्या घरची आर्थिक स्थिति खराब होती. लॉकडाउन दरम्यान त्यांची अवस्था अधिकच नाजूक झाल्याने त्यांनी निराश होऊन आत्महत्या केली. त्यांचा तीन एकर ऊस शेतात पडून आहे. एसपी यांनी या पीड़ित परिवाराला 1 लाख रुपयांचे आर्थिक सहकार्य दिले आहे. सरकारने त्यांना 10 लाख रुपये द्यावेत.

यापूर्वी कांग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी शेतकऱ्याच्या आत्महत्येसाठी उत्तर प्रदेश सरकार च्या योगी सरकारला जबाबदार धरले आहे. त्यांनी योगी सरकारवर ऊसाचे पैसे शेतकऱ्याला न दिल्याचा आरोप केला आहे.

प्रियंका गांधी यांनी ट्विट केले आहे की, आपल्या ऊसाचे पिक शेतात वाळत असलेले पाहून आणि पावती न मिळाल्यामुळे मुजफ्फरनगर येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. भाजपा चा हा दावा होता की, 14 दिवसांच्या आत पूर्ण पैसे भागवले जातील पण हजारो करोड रुपये आपल्याकडेच ठेवून साखर कारखाने बंद पडले आहेत. ”

यापूर्वी देखील अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर ऊस थकबाकी वरुन निशाणा साधला होता, त्यानंतर राज्याचे ऊस मंत्री सुरेश राणा यांनी त्यांना त्याचे उत्तर ट्वीट च्या माध्यमातूनच दिले होते. जिथे त्यांनी ऊस थकबाकी भागवल्याचे आकडेही सादर केले होते

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here