साथा साखर कारखान्याची स्थिती गंभीर: सपा नेत्याचा आरोप

41

अलीगड : समाजवादी पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज चौधरी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. दोन्ही सरकारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी निराश आणि हताश आहेत असे ते म्हणाले. ऊसाच्या दरात २५ रुपयांची वाढ करून सरकारला वाटते की शेतकऱ्यांचे भले होईल. त्यांना आर्थिक बळ मिळेल. मात्र, असे होण्याची शक्यता नाही. सरकारने इकडे दरवाढ केली, मात्र आधीच घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेलच्या दरात भरभक्कम वाढ केली आहे असे चौधरी म्हणाले. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात ४०० रुपये प्रती क्विंटल ऊस दर करण्याची घोषणा केली होती. त्या आश्वासनापासून सरकार पळ काढत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला. ऊसाचा दर थेट ४०० रुपये प्रती क्विंटल केल्यास शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल असे त्यांनी सांगितले.

मनोज चौधरी म्हणाले, शेतकऱ्यांना याआधीचे थकीत पैसे मिळाले पाहिजेत. साथा साखर कारखान्याची स्थिती खराब आहे. शेतकरी चार वर्षांपासून चिंताग्रस्त आहेत. शेतकरी साखर कारखान्याबाहेर उभा असतो आणि त्याचा ऊसही बाहेरच असतो. कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांच्या समस्या कोणीही ऐकत नाही. मुख्यमंत्री अलीगडमध्ये अनेकदा आले आहेत. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतलेल्या नाहीत. कारखान्यात नवे युनीट सुरू करण्याबाबत सांगितले होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे अलीगडचे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

जेव्हा शेतकऱ्यांच्या हिताची बाब असते, तेव्हा डिफेन्स कॉरीडॉरबाबत सांगितले जाते. जे शेतकरी सहा महिने शेतात राबून पिक घेतात ते अन्नदाते हताश आहेत. त्यामुळे यावेळी शेतकरी सपाचे नेते अखिलेश यादव यांच्या सायकलला गती देतील. त्यातून राज्यालाही गती मिळेल असे मनोज चौधरी यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here