संजीवनी साखर कारखान्याच्या आगामी गाळप हंगामाबाबत शेतकर्‍यांच्यात संभ्रम

96

पोंडा, गोवा: संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या भविष्याबाबत सरकारच्या भूमिकेमुळे ऊस शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारखान्याच्या भविष्याबाबत निर्णय घेण्यासाठी ऊस शेतकर्‍यांनी सरकारला 25 सप्टेंबरची डेडलाइन दिली आहे, तोपर्यंत सरकार निर्णय घेण्यात अपयशी ठरले तर 29 सप्टेंबरला कारखान्यासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. ग्रोअर्स असोंसिएशन ऑफ गोवा यांनी मंगळवारी कारखान्यामध्ये आयोजित बैठकीमध्ये हा निर्णय घेतला. आगामी गाळप हंगामा दरम्यान कारखाना सुरु होईल की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.

गाळपामुळे वार्षिक देखभालीचे काम गणेश चतुर्थी नंतर लगेचच सुरु होत होते. पण या वर्षी दुरुस्ती आणि देखभालीचे कोणतेही काम सुरु झालेले नाही. शेतकर्‍यांच्यात संभ्रमावस्था आहे की, आगामी गाळप हंगामा दरम्यान कारखाना सुरु होणार की नाही. गेल्या हंगामात सरकारने कारखाना सुरु केला नाही, पण स्थानिक शेतकर्‍यांकडून ऊस खरेदी करुन तो कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये दोन कारखान्यांना पाठवण्यात आला होता.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here