दुसऱ्या राज्यातील ऊस घेतल्याने वजन काटा बंद पाडून शेतकऱ्यांचा गोंधळ

पानीपत : नव्या डाहर साखर कारखान्याच्या आवारातील वजन काट्याजवळ पानीपतच्या शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेशातून ऊस घेऊन आलेल्या दोन ट्रॅक्टर ट्रॉली पकडल्या. दुपारी साडेबारा वाजता शेतकऱ्यांनी गोंधळ घालत वजन काटा बंद पाडला. उत्तर प्रदेशातून २६० रुपये प्रती क्विंटल ऊस घेवून पानीपत साखर कारखान्यात ३६२ रुपये प्रती क्विंटल दराने विक्री सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. स्थानिकांचा ऊस न घेता दुसऱ्या राज्यातील अथवा जिल्ह्यातील उसाची खरेदी करू देणार नाही असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला.

दैनिक ट्रिब्यून ऑनलाइनने दिलेल्या वृत्तानुसार शेतकऱ्यांनी वजन प्रक्रिया बंद पाडल्याची माहिती मिळताच कार्यकारी संचालक नवदीप सिंह नैन यांनी घटनास्थळी धाव घेतली. आधी पानीपत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाच ऊस स्वीकारला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यकारी संचालक आणि शेतकऱ्यांनी चौकशी केल्यानंतर त्यांना आढळून आले की, पानीपत जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनीच या उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना आपली तोडणी पावती दिली होती. या दोन्ही शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करार रद्द करण्यात आला असून त्यांच्या ऊसाने भरलेल्या ट्रॉल्या बाजूला काढण्यात आल्या. जर अशा प्रकारे एखादा शेतकरी आपली तोडणी पावती उत्तर प्रदेशातील शेतकऱ्याला देत असेल तर त्याचा करार रद्द करावा अशी मागणी पानीपतमधील शेतकरी रामकिशन बिहौली, निशान सिंह मलिक, रणबीर कादियान सिवाह, रमेश भाऊपूर आदींनी केली. यावेळी कारखान्याचे चीफ इंजिनिअर राजकुमार, अधीक्षक प्रवीण देशवाल, इंजिनीअर रवि मान, स्वीय सहाय्यक विजय राठी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here