भोगावती कारखान्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप-जद आघाडीचे पॅनेल जाहीर

कोल्हापूर : शाहूनगर-परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याची निवडणूक लागणार कि बिनविरोध होणार ? याकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर भोगावातीची निवडणूक लागलीच, भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी कामगार पक्ष व जनता दलाच्या संयुक्त आघाडीच्या उमेदवारांची बुधवारी रात्री उशिरा घोषणा करण्यात आली. विद्यमान उपाध्यक्षांसह ११ संचालकांना पुन्हा संधी मिळाली आहे.

सत्ताधारी काँग्रेसला चौदा व राष्ट्रवादी आणि शेकापक्षाला अकरा जागा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, १९ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील व त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार संपतराव पवार-पाटील या दोन गटांचे मनोमिलन झाले. यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी महत्वाची भूमिका निभावल्याचे सांगितले जात आहे. या आघाडीमध्ये शेकापक्षासह राष्ट्रवादी काँग्रेसचा ए. वाय. पाटील गट व जनता दलही सहभागी झाला आहे.

आ. पी. एन. पाटील, ए. वाय. पाटील व क्रांतिसिंह पवार-पाटील यांनी यादी जाहीर केली. यामध्ये विद्यमान उपाध्यक्ष उदयसिंह पाटील- कौलवकर यांच्यासह ११ संचालकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर ५ माजी संचालकांना पुन्हा संधी मिळाली आहे. ९ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

गटनिहाय उमेदवार असे :

गट क्रमांक १ कौलव : उदयसिंह बाळासाहेब पाटील-कौलवकर (कौलव ), धीरज विजयसिंह डोंगळे (घोटवडे), राजाराम शंकर कवडे (आवळी बुद्रुक).

गट क्रमांक २ राशिवडे बुद्रूक : कृष्णराव शंकरराव पाटील, अविनाश तुकाराम पाटील (दोघे राशिवडे बुद्रुक), आनंदा धोंडिराम चौगुले (शिरगाव) अनिरुद्ध ऊर्फ मानसिंग विष्णुपंत पाटील (तारळे खुर्द).

गट क्रमांक ३ कसबा तारळे : अभिजित आनंदराव पाटील (गुडाळ), रवींद्र दत्तात्रय पाटील, दत्तात्रय हणमंत पाटील (दोघे कसबा तारळे).

गट क्रमांक ४ कुरुकली : धोंडिराम ईश्वरा गोपाळपाटील (परिते), शिवाजी पांडुरंग कारंडे (बेले), पांडुरंग शंकर पाटील (कुरुकली), केरबा भाऊ पाटील (कोथळी).

गट क्रमांक ५ सडोली खालसा : शिवाजीराव आनंदराव देवाळेकर-पाटील (देवाळे), भीमराव अमृता पाटील (वाशी), रघुनाथ विठ्ठल जाधव (बाचणी), अक्षयकुमार अशोकराव पवार-पाटील

(सडोली खालसा).

गट क्रमांक ६ हसूर दुमाला : प्रा. डॉ. सुनील आनंदराव खराडे, सरदार चिल्लाप्पा पाटील (दोघे हसूर दुमाला).

महिला : सौ. सीमा मारुतराव जाधव (बाचणी), सौ. रंजना दिनकरराव पाटील (आणाजे).

इतर मागास वर्ग : हिंदुराव दादू चौगुले (ठिकपुर्ली).

मागास वर्ग : दौलू गंगाराम कांबळे (आमजाई व्हरवडे).

भटक्या विमुक्त जाती : तानाजी गोविंद काटकर (ठिकपुर्ली)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here