भोगावती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे प्रा. शिवाजीराव पाटील बिनविरोध

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील शाहूनगर-परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या नूतन अध्यक्षपदी काँग्रेसचे प्रा. शिवाजीराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. निलकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नूतन संचालक मंडळाच्या या पहिल्या बैठकीत उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे राजेंद्र कवडे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा निवडीनंतर सत्कार करण्यात आला. निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष साजरा केला.

नूतन अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी सांगितले की, भोगावती कारखान्याचा कारभार सभासदांच्या हिताच्या दृष्टीने काटकसरीने कारभार केला जाईल. प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी स्वागत केले. गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन कृष्णराव किरुळकर, गोकुळचे संचालक किसन चौगले, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांनी सुत्रसंचलन केले. संचालक प्रा. राजेंद्र कवडे आभार मानले. सुनिल खराडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here